सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्व.रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/06/2026 : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्व. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
कॉम्प्युटर पदवी विभागातील महिला प्राध्यापिका प्रगती पाटील यांच्या हस्ते स्व. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय समन्वयक पोपट भोसले-पाटील यांनी स्व.रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याची ज्योत कायम आपल्या कामातून तेवत ठेवूया असे सांगितले. या प्रसंगी सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक व सूत्रसंचालन म्हणून प्रा. भारती चंदनकर यांनी काम पाहीले.

0 टिप्पण्या