विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

 संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 06/06/2026 :

जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, ती आपण नेहमी आवडीने करतो आणि जी गोष्ट आवडत नाही, तिकडे सहज दुर्लक्ष करतो. शाळेत देखील जो विषय आपल्या आवडीचा असतो, त्याचा आपण नेहमी मन लावून अभ्यास करतो.

परंतु अनेकदा, आपले आवडते शिक्षक जो विषय शिकवतात, तोच विषय आपल्याला जास्त आवडतो. याउलट, कडक शिस्तीचे किंवा कडक वागणारे शिक्षक आवडत नाहीत म्हणून, ते शिकवत असलेला विषय देखील आपल्याला नावडता वाटू लागतो.

आपले सर्व विषय उत्तम असावेत यासाठी अभ्यासात 'आवडते-नावडते' असा भेदभाव कधीही करू नका. जो विषय तुम्हाला जास्त अवघड वाटतो, त्याला अभ्यासासाठी थोडा जास्त वेळ द्या, तो विषय शिक्षकांकडून व्यवस्थित समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या विषयाशी छान दोस्ती करा!

लहान वयातच अशी आवड-निवड न करता सर्वच गोष्टींना समान न्याय देण्याची ही सवय तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडेल.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या