वाघमारे 卐 काटकर शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/06/2026 : स्व. राधाबाई व ह.भ.प.स्व. रघुनाथ रामचंद्र वाघमारे यांची नात आणि सौ रोहिणी व श्री नामदेवराव रघुनाथ वाघमारे राहणार बागेचीवाडी - अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची द्वितीय कन्या चि.सौ. कां.पल्लवी आणि स्व. यशोदाबाई ह भ प विठ्ठल सिताराम काटकर यांचे नातू आणि सौ प्रमिला व श्री कुंडलिक विठ्ठल काटकर (हल्ली मुक्काम पनवेल) राहणार डिकसळ तालुका खटाव जिल्हा सातारा यांचे जेष्ठ चिरंजीव कुणाल यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 27/6/2026 रोजी दुपारी 12 वा.29 मि. या शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.
निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून मुली वाचवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान, पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे वाचवा झाडे जगवा असा सामाजिक आणि पर्यावरण पूरक संदेश वाघमारे परिवाराच्या वतीने देण्यात आला.
श्री आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर - अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांचे वाघमारे आणि काटकर परिवाराच्या वतीने स्वागत, सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या