अकलूज मध्ये काशी जगद्गुरूंची मिरवणुक व "मार्ग हा मुक्तीचा" ग्रंथदिंडी सोहळा साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/06/2026 :
पुरुषोत्तम मास निमित्त वीरशैव लिंगायत समाज अकलूज यांनी काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या "मार्ग हा मुक्तीचा" ग्रंथाची पालखी व जगद्गुरू यांची रथामधून मधून मिरवणूक काढण्यात आली. काशी जगद्गुरूंचे गांधी चौक अकलूज येथील शेटे निवासस्थान समोर स्वागत सन्मान सोहळ्यासाठी काँग्रेस चे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी जय्यत तयारी केली.
महाराजांचे स्वागत गांधी चौक येथे गिरीश प्रभाकर शेटे व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मिरवणूक गांधी चौक येथून महादेव मंदिरा समोर येताच सुवासिनींनी कलशामधील पाणी महाराजांच्या पायावर घालून स्वागत केले. काशी जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज,शिंगणापूर, सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज, समाजाचे अध्यक्ष राजू गुळवे, महालिंग राऊत, महिला अध्यक्षा सौ राजश्री गुळवे, बापू वैद्य इत्यादींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले
जगद्गुरुंचा सत्कार समाजाचे अध्यक्ष राजू गुळवे व सौ उत्कर्षा गुळवे यांनी केला तर शिंगणापूर महाराजांचा सत्कार महालिंग राऊत व वेळापूरकर महाराजांचा सत्कार गणेश नरुळे या उभयतांच्या हस्ते करण्यात आला. जगद्गुरूंची पाद्यपूजा श्री व सौ प्रकाश डीकोळे यांच्या हस्ते करण्यात आली.
जगद्गुरुंनी आशिर्वचना द्वारे लिंगायत समाज व संस्कार तसेच ग्रंथाची माहिती दिली, याप्रसंगी चार धाम यात्रा करून आलेले शिंगणापूरकर महाराज त्यांचा सन्मान जगद्गुरू यांनी केला. शेवटी श्री व सौ भीमाशंकर वैद्य यांच्या हस्ते महाआरती होऊन वीरशैव लिंगायत समाजाने आयोजित केलेल्या अन्नदानाचा सर्वांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले.







0 टिप्पण्या