विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/06/2026 :
शाळेत पहिल्या दिवशी जोरदार स्वागत झाले ना? सुशोभित शाळा, आखीव - रेखीव मैदान, स्वागताला शिक्षक, औक्षण, गुलाबाची फुले, छान छान बालगीते आणि बरेच काही. मजा आहे ना?
हे सर्व कशासाठी तर तुमच्या आनंदासाठी. आनंददायी शिक्षण दिल्याने मुलांना शाळेची, अभ्यासाची गोडी लागेल, तुम्हाला शाळेची ओढ वाटेल, शिक्षकांची भीती वाटणार नाही हा त्यामागील उद्देश.
मुलांनो, ही सर्व वातावरण निर्मिती झाली. खरे कार्य तर तुम्हाला करायचे आहे. मन लावून अभ्यास करणे, रोजच्या रोज गृहपाठ पूर्ण करणे, पाठांतर करणे याच्या जोडीला वेगवेगळ्या स्पर्धांमधून सहभागी होणे, मैदानी खेळ खेळणे व त्यामध्ये प्रावीण्य मिळवणे.
शालेय जीवनात आपला पूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो. इथेच खरे संस्कार होतात. स्वतःला घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या