🟣 पोलिसांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी!
🔵 कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये पोलीस कॉन्स्टेबल हेमंत वाघमारे यांचे उल्लेखनीय यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर, प्रतिनिधी दि.29/6/2026 : जगातील सर्वात कठीण आणि खडतर मानल्या जाणाऱ्या "कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन" स्पर्धेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वीर जवानांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांचे अंगरक्षक पोलीस अंमलदार हेमंत वाघमारे यांनी या जागतिक स्पर्धेत सोलापूरसह महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
जगातील सर्वात कठीण धावसंख्या. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात या "द अल्टिमेट ह्युमन रेस" म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रगीतानंतर पहाटे ५ वाजता या खडतर स्पर्धेला सुरुवात झाली.
डर्बन ते पीटरमॅरीट्सबर्ग
या मार्गावरील ही ८५.७७७ कि.मी. अंतराची अवघड चढाईची स्पर्धा होती. या जागतिक स्पर्धेत जगभरातून तब्बल २१,६७८ धावपटूंनी भाग घेतला होता. या अत्यंत कठीण स्पर्धेत सोलापूरच्या या सुपुत्रांनी फिनिशिंग लाईन गाठत नवा इतिहास रचला:पोलीस कॉन्स्टेबल हेमंत वाघमारे यांनी हे अवाढव्य अंतर अवघ्या ९ तास २९ मिनिटांमध्ये पूर्ण केले.
त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामधून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
*मानवी क्षमतेची खरी कसोटी आणि तिरंग्याचा अभिमान
ही केवळ एक धावण्याची स्पर्धा नसून मानवी क्षमतेची खरी कसोटी मानली जाते.
स्पर्धेतील अनेक कटऑफ पॉईंट्स आणि निर्धारित वेळेत पोहोचण्याचे आव्हान पार करत,
खराब हवामान, प्रखर थंडी,
जीवघेणी उष्णता आणि
मानसिक-शारीरिक आव्हानांवर मात करून या धावपटूंने हे यश मिळवले.
अंतिम ४०० मीटरच्या टप्प्यात हजारो प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अंगावर शहारे आल्याची भावना वीरांनी व्यक्त केली.
अंतिम रेषा पार करून आंतरराष्ट्रीय भूमीवर तिरंगा फडकवतानाचा तो क्षण भारताचा अभिमान जगासमोर मांडणारा आणि अविस्मरणीय असा होता.
सोलापूर पोलीस दलाचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या या बहाद्दर उल्लेख यशाबद्दल नवरात्र महोत्सव युवक मंडळ बुबने चाळ,भैया चौकाचे ट्रस्टी उपाध्यक्ष श्री. सुनील जगताप यांच्या हस्ते श्रीदेवीची प्रतिमा देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे सदस्य विजयराज सुनील जगताप, मंडळाचे ट्रस्टी सदस्य सकलेश बाबुळगावकर,मंडळाचे सदस्य राजकुमार तिप्पटना वनकोरे आदी उपस्थित होते


0 टिप्पण्या