माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व.चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांची जयंती साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/06/2026 : माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी कार्यालया मध्ये स्व.चौधरी ब्रह्म प्रकाश यादव (16/6/ 1918 - 11/8/1993) यांची जयंती साजरी करण्यात आली.
नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्ली प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांची 108 व्या जयंती निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, वाजिद हरुण सय्यद, सागर सुभाष भोसले, रितेश मोहन मस्के, आयान मुनवर शेख, महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या