काशी जगद्गुरूंसह मठाधीपतींचा अकलूज मध्ये शेटे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान

काशी जगद्गुरूंसह मठाधीपतींचा अकलूज मध्ये शेटे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/06/2026 : गांधी चौक अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील समस्त शेटे परिवाराच्या वतीने शेटे निवासस्थान समोर काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, उमेश प्रभाकर शेटे, जितेंद्र सदाशिव शेटे, कौस्तुभ गिरीश शेटे, यशराज गिरीश शेटे, यांच्यासह  शेटे परिवारातील सर्व महिला व पुरुष यांच्या वतीने  काशी जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, राजगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज शिंगणापूर, सदाशिव शिवाचार्य महाराज वेळापूरकर महाराज यांचा स्वागत सन्मान  शेटे परिवाराच्या वतीने करण्यात आला. 



त्यावेळेस सर्व शेटे परिवारासह  मित्रपरिवार आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित समाज भगिनींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि उपस्थित सर्वांसाठी चहा आणि पिण्याचे स्वच्छ  पाणी व्यवस्था गिरीश प्रभाकर शेटे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या