" अमृताचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे कंठ"- ह.भ.प. युवराज महाराज देशमुख

 " अमृताचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे कंठ"- ह.भ.प. युवराज महाराज देशमुख 

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 07/06/2026 :

" अमृताचे एकच ठिकाण आहे ते म्हणजे कंठ" असे विचार ह.भ.प. युवराज महाराज देशमुख (पंढरपूर) यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे व्यक्त केले. अधिक मास तपोपूर्ती सोहळ्यानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळ्यातील किर्तन मालेतील सातव्या दिवसाचे पुष्पगुंपताना रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी सायंकाळी ते किर्तन सेवेत प्रबोधन करीत होते.  

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा "कंटी राहो नाम | अंगी भरूनीया प्रेम" || हा अभंग त्यांनी किर्तनासाठी निवडला होता.

"या जगात न मागणारा जन्माला आला नाही" असे प्रतिपादन करीत असताना संतांचे मागणं जगाच्या कल्याणासाठी असते आणि देवांचे मागणे भक्तांच्या रक्षणासाठी असते तद्वत जीवाचे ही मागणी असते याबाबत सविस्तर विवेचन केले.

🟡 दिंडी सोहळा

पारायण सप्ताह सोहळा समाप्ती दिनाच्या च्या पूर्वसंध्येला व्यासपीठ चालक ह. भ. प. दत्तात्रय महाराज फरांदे यांच्या सुयोग्य नियोजना खाली पालखी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पारायण व्यासपीठ भव्य सभा मंडपातून निघालेला पालखी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात गाजत गाजत येऊन विसावला. तेथून मानपान घेऊन मंदिर प्रदक्षिणा करीत पालखी सोहळा मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा करीत पारायण सोहळा सभा मंडपी येऊन स्थिरावला. पालखी दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायातील मान्यवर, दूर दूरच्या ठिकाणाहून आलेले तसेच पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ, सोहळ्याचे प्रारंभा पासूनचे प्रसिद्धीकरण प्रिंट मीडिया तसेच डिजिटल मीडिया मध्ये करणारे अकलूज वैभव आणि वृत्त एक सत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संग्रामनगर अकलूज) इत्यादी सहभागी झाले.

🟢 अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी विजय कोळपे करंजे पूल यांच्या कोळपे साऊंड सर्व्हिस, संपूर्ण फोटोग्राफीचे नियोजन राजेश मोहन भांडवलकर यांच्या कृष्णाई फोटो सोमेश्वर मंदिर, सोहळा पूर्व पासून सोहळा समाप्ती पर्यंतचे वृत्तपत्र आणि डिजिटल न्यूज प्रसिद्धीकरण करणारे अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचेही योगदान लाभले. श्रीं ची शिवलिंग प्रतिमा असणारे सन्मानचिन्ह फोटो फ्रेम किरण शेठ आळंदीकर करंजे पूल (पुनम ज्वेलर्स आळंदीकर), फोर कलर जाहिरात पत्रक सौजन्य निकिता कार्ड्स बारामती,

🔵 सोमवार दिनांक 8/6/2026 रोजी सकाळचा नाष्टा अक्षय बापू कामठे, पुणे.

🟠 आगामी पारायण  सोहळा

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक 09/12/2026 ते 16/12/2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त मोहनराव मुरलीधर भांडवलकर यांनी अकलूज वैभव व वृत्त एकसत्ता ला दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या