"ज्या सेवेने ईश्वर प्रसन्न होतो तिला पूजा म्हणतात" - ह.भ.प. जयंत महाराज गोसावी
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 06/06/2026 :
"ज्या सेवेने ईश्वर प्रसन्न होतो तिला पूजा म्हणतात" असे प्रतिपादन ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथे केले. अधिकमास तपोर्तीपूर्ती सोहळ्या निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळ्यातील कीर्तन मालेतील सहाव्या दिवसाचे पुष्पगुंफताना शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी ते बोलत होते.
"समर्पिली वाणी | पांडुरंगी घेतो धनी ||पूजा होती मुक्ताफळी | रस ओवीया मंगळी|| धार अखंडित | ओघ चालीयेला नित्य|| पूर्ण होती जीव| तुका होऊन ठेला भाव||" जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग आपल्या कीर्तन सेवेसाठी ह भ प जयंत महाराज गोसावी (संत निवृत्तीनाथ संस्थान, त्रंबकेश्वर- नाशिक) यांनी निवडला. या अभंगास केंद्रबिंदू ठेवून वांग्मय पूजेचे स्वरूप किर्तन सेवेद्वारे विशद केले.
जीवदशा सारखी आहे पण देह सारखा नाही, पाप पुण्य समानता येते तेव्हा मनुष्य देह मिळतो. मनुष्यवाणी ही तिसऱ्या क्रमांकाची विभूती आहे. वाणीने खरेच बोलावे वाणीने कोणाची निंदा करू नये. किर्तनामध्ये दोषांची निंदा करा. किर्तन अभ्यासपूर्ण हवे, किर्तनाला व्यापाराचे स्वरूप आल्याने अनाधिकारी लोक किर्तन करू लागलेत. किर्तन कोणी करावे तसे किर्तन कोणी ठेवावे हे ही महत्त्वाचे आहे. नाही तर पाहुनिया "मोबाईल करावे कीर्तन" अशा बाबींवर आघात करताना सांप्रदायिक मार्गावरील प्रदूषणाची कारणमीमांसा कीर्तना सेवेद्वारे त्यांनी प्रभावीपणे मांडली ते पुढे म्हणाले पूर्वी किर्तनांची संख्या कमी होती आता किर्तनांची संख्या वाढली तशीच बिघडलेल्या लोकांची संख्या वाढली मग किर्तना द्वारे प्रबोधनाचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "संतांचे विचारदीप कीर्तनाद्वारे लावण्यासाठी कीर्तन आहे, कीर्तन करमणुकीचे नाही" असेही ठणकावून त्यांनी सांगितले वारकरी संप्रदायामध्ये घुसलेल्या अनिष्ट प्रवृत्ती आणि कृतीं विरोधात आपल्या सहज सुलभ भाषा शैलीतून, फटकारे लगावले. वणीचे समर्पण ईश्वरचरणी, वाणीने अखंड नामचिंतन केल्याने वणीच्या द्वारे पूजा होते. परमार्थिक फळ सारखच आहे असेही त्यांनी सांगितले.
🟠 भारुड : किर्तन सेवेनंतर ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू बावडा यांनी अभिनय पूर्ण भारुड सादर केले.
🔵 श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रारंभापासून कालपर्यंत ह भ प सुरेश महाराज सुळ (संस्थापक श्री ज्ञानाई गुरुकुल शिक्षण संस्था संग्रामनगर - अकलूज), भागवताचार्य हभप उमेश महाराज दशरथे आळंदी, ह भ प योगेश महाराज पालखीवाले (श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण), ह भ प केशव महाराज नामदास (श्री संत शिरोमणी नामदेव महाराज वंशज पंढरपूर), ह भ प कानोबा महाराज देहूकर (श्री देहुकर महाराज फड, पंढरपूर) यांनी कीर्तन सेवा श्री सोमेश्वर चरणी अर्पण केली, तर रविवार दिनांक 7 जून रोजी ह भ प युवराज महाराज देशमुख पंढरपूर यांचे किर्तन होणार आहे. सोमवार दिनांक 8 जून रोजी हभप पांडुरंग महाराज घुले (प्रणेते श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू) यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. काल्याचा प्रसाद राजेंद्र काकडे देशमुख यांच्यातर्फे आहे.
🟣 या सोहळ्यातील उपस्थित भाविकांची दैनंदिन अल्पोपहारा साठी अनुक्रमे विलास भगवान शेंडकर शेंडकरवाडी, श्रीपाल आप्पासो सोरटे सोरटेवाडी, मधुकर रामचंद्र फरांदे मुरूम, दिलीप गणपतराव भिलारे मुरूम, शिलेदार ज्ञानदेव सेंडकर शेंडकरवाडी, विठ्ठल सोमनाथ गायकवाड करंजे पूल, बबनराव आण्णासो पवार करंजे यांचे आर्थिक योगदान आहे.
🟢 दैनंदिन सकाळची पंगत अनुक्रमे : दत्तात्रय अनंतराव घोरपडे सो. नगर, सचिन लखीमचंद अग्रवाल सो. नगर, सदाशिव दत्तात्रय गाढवे मावडीकर, संतोष दशरथ कोंढाळकर मगरवाडी, महेश मल्लय्या सत्तेगिरी सो.नगर, बाळासो विश्वनाथ भांडवलकर व बाबुराव बापुराव भांडवलकर सोमेश्वर मंदिर, अक्षय विजय जगताप आंबळे,
🟢 दैनंदिन संध्याकाळची पंगत अनुक्रमे : रामदास रघुनाथ डोईफोडे सो. नगर, विजयकुमार माणिकराव सोरटे सोरटेवाडी, योगेश उत्तमराव सोरटे सोरटेवाडी, प्रमोद भगवानराव काकडे देशमुख, राजवर्धन शिवाजीराव शिंदे मुरूम, आप्पासो कृष्ण गायकवाड करंजे पूल, संग्राम तानाजीराव सोरटे मगरवाडी
श्रीक्षेत्र सोमेश्वर श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे (तालुका बारामती जिल्हा पुणे) चे चेअरमन अनंत वामन मोकाशी, सचिव विपुल विलासराव भांडवलकर, खजिनदार सचिन सतीश भांडवलकर, विश्वस्त रूपचंद बाळासो भांडवलकर, मोहन मुरलीधर भांडवलकर, प्रताप मारुती भांडवलकर, अमोल बाळासो भांडवलकर, प्रदीप बबन आणि चेअरमन, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना इत्यादी हा सोहळा यशस्वीपणे राबविण्यासाठी राबविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. देवस्थानच्या वतीने आवश्यक त्या सर्व मूलभूत सोयी सुविधांची उपलब्धता देवस्थानच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या