मनाची शुद्धता
राजर्षी शाहू महाराज जयंती
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/06/2026 : आज २६ जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्त त्यांचे चरित्र पाहिले तर आपल्याला अनेक प्रेरणादायी कार्ये दिसतील. त्यांच्या गुणांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
शाहू महाराजांचा कौटुंबिक वारसा मोठा होता पण ते सदैव सर्वसामान्यांचा विचार करत. जातीयभेदाला पूर्णविराम देण्यासाठी, बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे, समाज घडवावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असत.
आज समाजात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपल्या कृतीतून आपण ती दाखवून दिली तर जातिभेद, वर्णभेद दूर होईल. समानतेच्या नात्यातून एकसंघ समाजाचा विश्वापुढे आदर्श राहील.
आजचा संकल्प
थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करताना फक्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन न करता त्यांच्या प्रतिभेचे पूजन करू व त्यांच्या सद्गुणांचा वर्तनात अवलंब करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या