विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/06/2026 : आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. या दिनाचे औचित्य साधून आपण काही गोष्टींची चर्चा करू. अंमली पदार्थ म्हणजे नशा आणणारे पदार्थ. ज्याचे सतत सेवन करणे याला व्यसन करणे असे म्हणतात.

अंमली पदार्थ सेवन करण्याची एकदा सवय लागली की पैसा तर जातोच पण व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक हानी होते. कुटुंबाची घडी विस्कटते. त्यांचे सामाजिक स्थान खाली घसरते. त्यातून क्वचित गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते.

मुलांनो, आपल्या घरात, नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी कोणी व्यसनांच्या आहारी गेले असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. त्या अनुभवातून आपण स्वतः भविष्यात असे काही न करण्याचा निश्चय करा.

व्यसनाने फक्त एखादी व्यक्तीच पोखरली जात नाही तर पूर्ण समाज व देश पोखरला जातो. निर्व्यसनी राहून देश वाचवा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या