श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/06/2026 : पुरुषोत्तम मास तपोपूर्ती निमित्त श्री सोमेश्वर देवस्थान येथे आयोजित केलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे (तालुका बारामती जिल्हा पुणे) यांच्या वतीने अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा द्वापार युगातील स्वयंभू आणि जागृत शिवलिंगाची प्रतिमा, श्रीफळ आणि मानाची शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी राजेश मोहनराव भांडवलकर टिपलेल्या छायाचित्रात बाळासाहेब भांडवलकर, शिवभक्त कुंभार, देवस्थानचे विश्वस्त मोहनराव मुरलीधर भांडवलकर, सोहळ्याचे व्यासपीठ चालक ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे, देवस्थानचे खजिनदार सतीशराव भांडवलकर, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, देवस्थान ट्रस्ट चे सचिव विपुल विलासराव भांडवलकर दिसत आहेत.
.

0 टिप्पण्या