एन यु बी सी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांची 108 जयंती सर्वत्र साजरी होणार

 

एन यु बी सी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांची 108 जयंती सर्वत्र साजरी होणार

वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/06/2026 :
नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्ली प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांची 108 वी जयंती 16 जून रोजी देशभर विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे असे महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा एस. गीता यांनी सांगितले अशी माहिती महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितली.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सदस्यांनी आपापल्या परीने आप आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्व. चौधरी ब्रह्म प्रकाश यादव यांच्या 108 व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून सामाजिक उपक्रम राबवून विनम्र अभिवादन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या