सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यात
शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 06/06/2026 : शंकरनगर - अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक "श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवार दिनांक ०६/०६/२०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता श्री शिवपार्वती देवालय, शंकरनगर येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करणेचा सोहळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला तसेच यावेळी फटाकेची आतीषबाजी करणेत आली.
या कार्यक्रमाकरिता संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, डॉ. सुभाष कटके, रामचंद्र ठवरे तसेच शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, अशोक पताळे, कार्यकारी संचालक सुहास यादव व खातेप्रमुख, अधिकारी, पत्रकार बंधु, कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख तसेच सर्व कामगार व शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या