सोलापूर जिल्हा पुर्व काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक

 

सोलापूर जिल्हा पुर्व काँग्रेस कमिटी                

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/05/2026 :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रातांध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार व देशाचे नेते,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी  यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीमध्ये SRI मतदार यादी पुर्णनिरीक्षण संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. 

 तरी सोलापूर जिल्हा (पुर्व) काँग्रेस कमिटीचे अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा व बार्शी विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षाचे पदाधिकारी,तालुका /ब्लॉक अध्यक्ष, फ्रंटल, सेल, विभागाचे जिल्हाध्यक्ष,तालुका पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सभापती,उपसभापती, सदस्य, नगरपरिषद व नगरपंचायतीचे आजी/माजी नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या