भारताची वाटचाल गुलामगिरीकडे?

 भारताची वाटचाल गुलामगिरीकडे?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/05/2026 :

जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाची वाटचाल गुलामगिरीकडे सरकू लागली आहे. दिसायला जरी लोकशाही असली तरी मागील 12 वर्षापासून हुकुमशाहीच सुरु आहे. सर्व स्वायत्त शासकीय यंत्रणांचा आपल्याला हव्या तशा पध्दतीने सरकार असूनही दोनच व्यक्ती वापर करत आहेत. सरकारमध्ये सर्व खाती, विभाग असूनही त्या प्रमुखाचे नाव पुढे न येता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाव पुढे केले जात आहे. भारत सरकार असे संबोधायचे सोडून मोदी सरकार असे म्हटले जात आहे. घटना न बदलताच घटने विरोधी कार्य करुन आम्ही घटना मानणारच नाही अशाप्रकारे सरकार चालविले जात आहे. सर्व विरोधी पक्षांना संपवून लोकशाही मुल्यांना आणि घटनेच्या मुळ संकल्पनेलाच संपविण्याचे काम सुरु आहे. *हे सर्व कमी होते की काय तर आता संपुर्ण भारत देशच अमेरीकेच्या ताब्यात दिला गेला आहे.

     एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्यापासून अशी त्यांची कोणती नस डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती लागली आहे की ते भारताला ब्लॉकमेल करु लागले आहेत. नुकतेच झालेले भारत पाकिस्तान युध्द अमेरिकेनेच थांबविले अशी उघडपणे जगाला सांगून अमेरीकेच्या शेतकऱ्यांना भारताची बाजारपेठ खुली करुन भारताच्या शेतकऱ्यांना मात्र अमेरीकेत शेतमाल विकण्यास कर लावण्यात आले आहे. याबाबत भारत सरकारने सरळसरळ करारनामा करुन घेतला आहे. आणि आता तर अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी त्याची एक झलक दाखविताना परवाच्या दिल्ली भेटीत त्यांनी परस्पर भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्स चा माल खरेदी करेल अस एकतर्फी जाहीर करुन टाकले. हे भारतासाठी लाजिरवाणे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे असे वक्तव्य गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोठ्या जबाबदारीने केले आहे. म्हणजेच आपला भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आडून अमेरिकाच चालवत आहे असे धक्कादायक वृत्त आहे. मोदींना ब्लॅकमेल करुन अजून अनेक महत्वाचे करारनामे गुपचुप केल्यास अमेरिका युध्द न करताच भारताला गुलाम बनवेल. 

हि अतिशय चिंताजनक बाब असून सर्व भारतीयांनी आपले धर्म, पंथ, जात भेद, वंश, राजकीय पक्ष, व्यक्ती पुजा, आपापसातले मतभेद आणि डोळ्यावरचा एकाच रंगाचा चष्मा बाजूला ठेऊन केवळ भारतीय म्हणून या गोष्टीकडे गांभिर्याने पाहिले पाहीजे. *गुगल सारख्या सीईओ पदावद असलेली महत्वाची व्यक्ती असे वक्तव्य जाहिरपणे करते म्हणजे यात नक्कीच तथ्य असणार. त्यामुळे भारताची गुलामगिकडे सुरु असलेली वाटचाल रोखायची असेल, तर जनतेने सरकारला जाब विचारावाच लागेल. आज जनता गप्प राहिली तर उद्या आपल्या पिढ्यानपिढ्या गुलाम राहतील. कारण आता पुर्वीसारखे मावळे, स्वातंत्र्य सैनिक, देशप्रेमी उठाव करण्यासाठी राहिले नाहीत. म्हणून अमेरिकेचा भारतावर संपुर्ण कब्जा होण्या आधीच जनतेने रस्त्यावरची लढाई लढणे गरजेचे आहे.

महेंद्र कुंभारे,

संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.


====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या