मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/05/2026 :
आपल्याला स्वतःचा चेहरा पाहायचा असेल, तर आरसा लागतो. आरशात आपण जसे आहोत, अगदी तसेच दिसतो. आपण हसल्याशिवाय आरसा कधीच हसत नाही; आणि आपण दुःखी-कष्टी असलो, तरीही आरसा हसत नाही.
समाजात वावरताना देखील आपल्याला असाच अनुभव येतो. आपण स्वतः हसतमुख आणि प्रसन्न असू, तर समोरील व्यक्ती पण आपल्याशी त्याच पद्धतीने बोलते. आपल्याशी संवाद साधताना त्यांना देखील प्रसन्न वाटते.
आपल्याशी समोरील व्यक्ती कोणत्या पद्धतीने बोलते, तो एक प्रकारे आपल्याच वागण्याचा आरसा असतो. इतरांनी आपल्याशी व्यवस्थित बोलावे-वागावे आणि आपल्याला आदर द्यावा असे जर आपल्याला वाटत असेल, तर प्रथम आपण स्वतः त्यांच्याशी त्या पद्धतीने वागणे अत्यंत गरजेचे आहे.
आजचा संकल्प
आपण जगाला जे देतो, तेच आपल्याकडे अनेक पटींनी परत येते; 'करावे तसे भरावे' असे म्हणूनच म्हणतात. त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक भाव मनात ठेवून सर्वांशी प्रेमळ व्यवहार करूया, जेणेकरून समोरील व्यक्ती देखील आपल्याशी तशाच आदराने वागतील.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या