श्रीमती मंजुळा जयवंत गुजर यांचे अकस्मात निधन

श्रीमती मंजुळा जयवंत गुजर यांचे अकस्मात निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/05/2026 :

मळोली, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सोमेश्वर दरबाराच्या मुख्य भक्त  श्रीमती मंजुळा जयवंत गुजर (वय 60 वर्षे) यांचे बुधवार दिनांक 13/5/2026 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहते घरी अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. 

गत काही महिन्यापासून त्यांच्यावर कॅन्सर आजारा संबंधी औषध उपचार सुरू होते. दिनांक 13 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मळोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम दाहसंस्कार करण्यात आले. तिसऱ्याचा विधी शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी मळोली येथे होणार आहे.

श्रीमती गुजर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कै.श्रीमती मंजुळा जयवंत गुजर यांचे अकस्मात निधना बद्दल  शिव शक्ती भक्त, प्रचारक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी दुःख व्यक्त करून समस्त सोमेश्वर भक्तजनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या