विचारधारा

 

विचारधारा

 वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक29/05/2026 : 

आपले विचार स्वच्छ आणि शुद्ध असतील, तर आपल्याला एक प्रकारची उत्तम मनःशांती मिळते. शुद्ध विचार म्हणजे मनात कोणताही वाईट किंवा कुटिल हेतू नसणे आणि कोणाबद्दलही आकस न ठेवणे.

असे मन जेव्हा मोकळे आणि निःस्वार्थ असते, तेव्हा आपल्या कृतीतूनही तोच साधेपणा दिसतो. कोणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता, अगदी स्थिर भावनेने समोरील व्यक्तीशी आपला संवाद होतो.

मुलांनो, असे सकारात्मक विचार जेव्हा कायम आपल्या मनात असतात, तेव्हा आपण वैचारिकदृष्ट्या एका वेगळ्याच उंचीवर असतो. त्यामधूनच आपले उत्तम संस्कार दिसून येतात आणि नकळत लोक आपले अनुकरण करू लागतात.

त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा, सजग राहा आणि सुसंस्कारी व्हा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या