बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 25/05/2026 :

आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांची  निवड झाली. ही निवड संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी केली. 



मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये असणारे भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली या  शाळा समितीचेसदस्य म्हणून काम करत आहेत. या काळात रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागातील एक सर्वोत्तम विद्यालय व्हावे  म्हणून  बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांनी प्रयत्न केले. राज्यातील पहिली गणित प्रयोगशाळा,  स्पर्धा परीक्षेचे माहेरघर,  राज्यात सर्वात जास्त स्पर्धा परीक्षेला लागणारे विद्यार्थी,  व्यवसाय शिक्षण व अनिवासी गुरुकुल, उत्तम सुंदर इमारत अशा अनेक कामांमध्ये  बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांचा अनमोल असा वाटा राहिला त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांची जनरल बॉडी सदस्य पदी निवड केली, याबद्दल विभागीय चेअरमन  संजीव पाटील व संस्थेचे चेअरमन  चंद्रकांत दळवी, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक व सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सर्व रयत सेवक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले