शिवैक्य शारदा महालिंग कथले यांचे प्रथम पुण्यस्मरण
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/05/2026 :
नातेपुते येथील शिवैक्य शारदा महालिंग कथले यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहण्यात आली.
यानिमित्ताने वीरशैव लिंगायत समाज अकलूज महिला भजनी मंडळ यांचे भजन सकाळी 10 ते 12 या वेळेत झाले. पुष्पवृष्टीनंतर आरती होऊन महाप्रसाद वाटप झाले.
याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाज अकलूज महिला भजनी मंडळातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती शशिकला प्रभाकर शेटे यांच्यासह भजनी मंडळातील उपस्थित सर्व महिला सदस्यांचा कथले परिवाराच्या वतीने मानपान देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे उपस्थित होते.


0 टिप्पण्या