मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/05/2026 :

आपली 'मिळकत' खूप असावी, असे प्रत्येकालाच मनापासून वाटत असते. त्यासाठी नोकरी, व्यवसाय किंवा शेती अशा विविध माध्यमांतून मिळकत मिळवली जाते. कष्ट करून, वेळ देऊन आणि स्वतःची बुद्धी चालवून मिळवलेली प्रामाणिक कमाई हीच खरी 'लक्ष्मी' असते.

परंतु, अनेकदा चुकीच्या किंवा वेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्यात लोक गुंतलेले दिसतात. जलद मार्गाने कमाई करणे, भ्रष्टाचार करणे किंवा वस्तूंमध्ये भेसळ करून मिळकत वाढवणे, असे गंभीर प्रकार केले जातात.

वास्तविक पाहता, अशी कमाई करणे पूर्णपणे गैर आहे. अशा मार्गाला कधीही यश लाभत नाही. ही केवळ वरवरची संपत्ती असते, पण त्यामध्ये मानसिक समाधान कधीच नसते. लक्षात ठेवा, ज्या वाईट मार्गाने हे पैसे कमावले जातात, अगदी त्याच मार्गाने ते विनाकारण खर्ची पडतात.

आजचा संकल्प 

आपली मिळकत कमी आहे की जास्त, यापेक्षा ती नेहमी योग्य आणि प्रामाणिक मार्गाने कमावलेली असावी. तिची 'लक्ष्मी' म्हणून आदरपूर्वक पूजा करूया आणि आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

============/=========

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या