मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/05/2026 :
आपल्या प्रत्येकाला आपल्या पुढील पिढीची... म्हणजे आपल्या मुलांची आणि त्यांच्या भवितव्याची काळजी असते. आपली मुले चांगली असावीत, समाजात त्यांना कोणी वाईट म्हणू नये, असे आपल्याला मनापासून वाटत असते.
यासाठी आपण काही गोष्टी गांभीर्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांवर होणारे 'संस्कार'. आपली मुले न कळत आपलेच अनुकरण करत असतात; सतत आपले निरीक्षण करत असतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या वागण्यात ते संस्कार प्रथम दिसले पाहिजेत.
आपल्या घरात मोठी माणसे सकाळी लवकर उठून व्यायाम करत असतील, त्यांना बाहेरचे खाण्याचे वेड नसेल, ती एकमेकांशी आदराने आणि प्रेमाने वागत असतील, कोणाच्या पाठीमागे टिंगल-टवाळी करत नसतील आणि नीतिमत्तेने वागत असतील, तर शंभर टक्के आपल्या मुलांना कोणीच नावे ठेवणार नाही.
आजचा संकल्प
आपली मुले चुकीचे वागणार नाहीत किंवा चुकीचे निर्णय घेणार नाहीत, यासाठी आपण घरातील मोठी माणसे नेहमी मर्यादेने आणि समजूतदारपणाने वागूया आणि अशा प्रकारे आपल्या मुलांचे भवितव्य घडवूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या