भोर मधील नसरापूर या गावातील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्या - काँग्रेस जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

 भोर मधील नसरापूर या गावातील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्या - काँग्रेस जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार.

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/05/2026 :

 महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील नसरापूर या गावातील एका चार वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्या. अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केली आहे. 

   चार  वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धास पोलिसांनी बेड्या ठोकून कोर्टासमोर उभा केल्यानंतर त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. ज्यावेळी त्याला कोर्टात नेत होते त्यावेळी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून त्याला आमच्या ताब्यात द्या. अशी मागणी करून मोर्चा काढला. महिलांनी सरकारवर ताशारे ओढले. हे सरकार मायबाप नसून जनतेच्या विरोधातील सरकार आहे. एकीकडे खरात प्रकरण, दुसरीकडे राज्यात भोंदू बाबांनी धुमाकूळ घातलेला आहे. आणि आमच्या महिला भगिनी सुरक्षित नाहीत. तिसरीकडे गॅस सिलेंडर साठी रांगा लावलेल्या दिसतात. आता पुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढणार आहेत. मध्येच कोणीतरी उठतो आणि थोर महापुरुषाबद्दल काहीतरी बोलून त्यांचा अवमान करतात. लहान मुली व महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. खरात सारख्या भोंदूबाबा समाजामध्ये सर्वसामान्य जनतेचे मानसिक भावनिक आर्थिक शोषण करीत आहेत.आशा भोंदूबाबा वरही कारवाई झाली पाहिजे. थोर पुरुषांच्या अवमान करणाऱ्या व्यक्तींनाही समज दिली पाहिजे. अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या