शांतीनाथ नारायण सुतार यांचे निधन; काँग्रेस तालुकाध्यक्षांची सांत्वन पर भेट

 


शांतीनाथ नारायण सुतार यांचे निधन; काँग्रेस तालुकाध्यक्षांचीसांत्वन पर भेट

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/04/2026 :

सहकारी संस्थेचे माजी सचिव आणि श्रीरामनगर माढा येथील  रहिवासी शांतीनाथ नारायण सुतार (वय 70 वर्षे) यांचे मंगळवार दिनांक 07/04/2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास राहते घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन झाले.

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे आणि सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी शुक्रवार दिनांक 10/4/2026 रोजी दुपारी माढा येथील निवासस्थानी जाऊन कै. शांतीनाथ नारायण सुतार यांचे धाकटे बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस चे ओबीसी विभागाचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार मोतीलाल नारायण सुतार यांची सांत्वनपर भेट घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या