लक्ष्मी नृसिंह मदिरात श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवास प्रारंभ

 

लक्ष्मी नृसिंह मदिरात श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवास प्रारंभ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/04/2026 : नीरा नरसिंहपूर (तालुका इंदापूर जिल्हा पुणे) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मदिरात श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवाचा प्रारंभ धार्मिक वातावरणात बुधवार दिनांक 22/4/2026 रोजी झाला. 

त्यानिमित्त सकाळी 6:00 वा.सनई चौघडा, स.7:0 वा. विष्णूसहस्रनाम स्तोत्र..स.8:00 वा. पंचामृत पवमान पंचसुक्त पुजा विश्वस्त अभय वांकर पाटील यांनी यथासांग केली. स.10:00 वा. समस्त ग्रामस्थ नीरानरसिंहपूर, शेवरे , टणू, संगम, गिरवी, बाभुळगांव, यांचे भजन झाले. दु.12ते 2  सर्व नृसिंह भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. दु.2 ते 3 पंढरपूरचे नंदकुमार डिंगरे यांचे "बासरी वादन" सुश्राव्य झाले. दु.4ते5 ह.भ.प बाळासाहेब देहूकर पंढरपूर(संत तुकाराम महाराज यांचे वंशज) यांचे  प्रवचन झाले. सायं. 5:30 ते 7:15 वा.श्रीपूर येथील "नाद ब्रम्ह भक्ती  संगीत " संगीताचा कार्यक्रम नंदकुमार पाटील, धनंजय कुलकर्णी, सौ.कल्पना कुलकर्णी, पाठक यांनी बहारदार केला..

रात्रो 9:00 वा.ह.भ,प प्रभंजन भगत महाराज शिर्डीकर यांनी  किर्तनातून नामस्मरण, भक्ती, परोपरकार .करा हा संदेश दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या