दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/04/2026 :
माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवरत्न शिक्षण संस्था आणि दक्षिण भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्था आयआयटी बझ (IITBUZZ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोफत ब्रिज कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
हा ब्रिज कोर्स दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून तो शिवरत्न मिलेनियम स्कूल, अकलूज येथे घेण्यात येणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दररोज तीन तासांचे दर्जेदार मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे आयआयटी व एनआयटी पार्श्वभूमी असलेल्या अनुभवी शिक्षकांकडून अध्यापन केले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे तयार केलेले स्टडी मटेरियल, डिजिटल शिक्षण सुविधा, तसेच JEE, NEET, MHT-CET, NDA यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षांचे सुसूत्र नियोजन दिले जाणार आहे. याशिवाय ब्रिज कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी १००% पर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाला अकलूज शहरासह माढा मतदारसंघातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.
नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा 📞 8208821365.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दर्जेदार तयारीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

0 टिप्पण्या