मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 01/03/2026 :

दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग समाधानाचे तर काही अडचणीचे येतात. सुख-समाधान हवेसे वाटते. आपण आनंदित होतो पण अडचणी आल्या की वाईट वाटते, खचून जातो, नाराज होतो.

खरे तर अडचणीच आपला खरा कस पाहतात. खरी परीक्षा अडचणीच्या काळातच असते. आपल्यातील जिद्द, चिकाटी, कणखरपणा, समयसूचकता, कष्ट करण्याची तयारी वगैरे गोष्टी अशावेळेस उपयोगी पडतात.

अडचणींवर मात करणे, हतबल न होता सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी करणे ही पहिली पायरी. अडचणीचा अभ्यास करून त्यातून बाहेर पडण्याची तयारी व कृतीतून सिद्ध करणे ही पुढील पायरी.

आजचा संकल्प

जीवनात अडचणी, समस्या या येतच राहतात. त्याचा बाऊ न करता विचारपूर्वक विश्लेषण करून व्यवस्थित मार्ग काढू व त्यातून बाहेर पडू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या