अजित पवारांचा खून देवेंद्र फडणवीसांनी केला आहे काय ?
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 13/03/2026 :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना होवून गेला. ज्या दिवशी विमान अपघाताचा प्रकार झाला त्या क्षणापासून जवळपास अवघा महाराष्ट्र त्यांच्या मृत्यूबाबत साशंक आहे. महाराष्ट्रातल्या चार-दोन नव्हे तर करोडो लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आहे. हे कोट्यावधी लोक अजित पवारांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा करताना दिसत आहेत. या तमाम लोकांना अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात वाटतो आहे. त्यांचा मृत्यू नव्हे तर 'खून' च केला गेला आहे अशी मानसिकता या तमाम लोकांची आहे. अजित पवारांचा खून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा, मोदी, तटकरे आणि पटेल आदी गँगने केल्याची चर्चा राज्याच्या काना-कोप-यात आहे. कोट्यावधी लोकांना असच वाटतय. त्यांना देवेंद्र फडणवीस, शहा व मोदी यांच्यावर शंका आहे. लोकं याबाबत उघड उघड चर्चा करताहेत. या पुर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भुषवलेल्या गोपिनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबतही अशीच चर्चा होती पण मुडेंच्या अपघाती मृत्यूपेक्षाही अजित पवारांचा अपघात मराठी मनाला पटताना दिसत नाही. लोक संभ्रमात आहेत. खरच अजित पवारांचा खून देवेंद्र फडणवीस आणि गँगने केला आहे काय ? या प्रश्नाच नेमकं उत्तर महाराष्ट्राला कोण देणार ?
अजित पवारांच्या मृत्यूची तटस्थपणे चाैकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. जे सत्य आहे ते जनतेसमोर यावे यासाठी आमदार रोहित पवार धडपडताना दिसत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदा घेवून अपघातातल्या अनेक भोंगळ व संशयास्पद बाबीं स्पष्ट केल्या आहेत. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यायचे सामर्थ्य राज्य सरकारकडे नाही. रोहित पवार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर त्याचा गुन्हा दाखल करायलाही नकार दिला गेला होता. जिथं कोंबड्या-कुत्री चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल केले जातात तिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का केली जाते ? ते ही रोहित पवार यांच्यासारख्या आमदाराची तक्रार का नाकारली जाते ? देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं भुषवलेल्या शरद पवारांचा पुतण्या मरतो, त्याची तक्रार त्यांचा आमदार असलेला पुतण्या द्यायला जातो आणि पोलिस नकार देतात याचा अर्थ काय ? रोहित पवारांच्या चाैकशीच्या मागणीवर भाजपवाल्यांना आक्षेप का आहे ? भाजपवाले त्यांना या बाबत ट्रोल का करतात ? विमानातला ब्लॅक बॉक्स गायब कसा होतो ? टिका झाल्यावर तो पुन्हा प्रकटतो कसा ? अजित पवारांच्या विमानाचा पायलट अचानक कसा बदलतो ? अजित पवारांचे नेहमीचे सुरक्षा रक्षक अचानक गायब कसे होतात ? विमानात बसण्यापुर्वीचे मुंबईतले कुठलेच फुटेज का समोर येत नाही ? अजित पवारांचे मृत शरिर इतके फुगलेले कसे ? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडले आहेत. अजित पवारांच्या मृत्यूची तटस्थ व सखोल चाैकशी व्हावी. नेमकं सत्य काय ते राज्याच्या जनतेसमोर यायला हवे. आतंरराष्ट्री़य स्तरावरून या अपघाताची चाैकशी व्हावी ही मागणी एकट्या रोहित पवारांचीच नाही तर तमाम मराठी माणसाची ही मागणी आहे. नेमकं काय घडलय ? अजित पवारांचा खरंच अपघात घडलाय की घातपात केलाय ? या बाबत लोकांना नेमकं आणि सत्य जाणून घ्यायचं आहे. राज्य सरकार या घटणेकडे गांभिर्याने पहायला तयार नाही. अजित पवारांचा मृत्यू झाल्या झाल्या सत्तेतले राज्यकर्ते राजकीय कुरघोड्या करण्यात दंग होते. अजित पवारांच्या मृत्यू नंतर तिस-याच दिवशी राज्याभिषेकाचा सोहळा या कारस्थानी लोकांनी आयोजित केला होता. अजित पवारांसारखा बलाढ्य नेता मरतो, त्याच्या मृत्यूच्या शोकात अवघा महाराष्ट्र बुडालेला असतो अशा स्थितीतही सत्तेचे सोहळे रंगवले जातात. शपथविधीची घाई, गडबड, धांदल, गुप्त खलबतं, डावपेच कशासाठी आणि कुणासाठी ? या मागचं कुटील राजकारण नेमकं काय आहे ? सत्तेच्या सारिपाटाचे डाव भडाग्नी विझण्याआधीच का रंगवले गेले ? नेमकी ही धांदल कशासाठी ? छत्रपती शिवरायांच्या मृत्यूची घटना लपवत संभाजी राजांना कैद करण्याची घाई करणारे तत्कालीन पंत कारभारी आणि अजित पवारांच्या मृत्यूनंतर तिस-याच दिवशी राज्याभिषेकाचा शपथविधी आयोजित करणारे राज्यातले कारभारी सारखेच कारस्थानी वाटताहेत. दोघांचाही हेतू स्वच्छ वाटत नाही.
राज्यातल्या कोट्यावधी जनतेच्या मनात संशय असेल तर राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीसांना नाही. फडणवीस यांच्याकडे खरेच नैतिकता असेल तर त्यांनी राजिनामा देवून या प्रकाराची निष्पक्ष चाैकशी करावी. एखाद्या आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास करावा. या तपासात ते जर निर्दोष सिध्द झाले तर त्यांनी पुन्हा दिमाखात राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ व्हावं. आज कोट्यावधी लोक त्यांच्याकडे संशयाचे बोट दाखवत आहेत. या कोट्यावधी लोकांना असं वाटतय की फडणवीसांनीच अजित पवारांचा खून केला आहे. राज्यातील कोट्यावधी लोकांना फडणवीसाच्या बाबतीत असे वाटत असेल तर ही बाब गंभीर आहे. फडणवीसांनी याचा गांभिर्याने विचार करावा. फडणवीसांनी स्वत:बद्दल जरूर आत्मचिंतन करावं. अजित पवारांच्या मृत्यूबाबत लोकांनी फडणवीसांना संशयाच्या कटघ-यात उभं केलं आहे. फडणवीसांनी लोकांना याची निखळ उत्तर द्यावीत. या निमित्ताने लोकांच्या मनात आपलं राजकीय चारित्र्य काय आहे ? याचा अंदाज देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा. कायमस्वरूपी देवाभाऊ, देवाभाऊ करून त्यांचे तळवे चाटणारे सत्तालोभी व स्वार्थी चमचे म्हणजे जनता नव्हे याचे भान त्यांनी ठेवावे. देेवेंद्र फडणवीस ज्या रामाचा आदर्श सांगतात त्या श्री रामाने लोकांच्यातली कुजबुज ऐकून बायकोला अग्निपरिक्षा द्यायला लावली होती. प्रिय सीतेला वनात सोडून दिले होते. जनतेच्या मनात काय चाललय ? याला इतक्या गांभिर्याने घेणा-या रामाचे नाव घेवून राजकारण करणा-या, "जय श्री राम" चे नारे देत राजकारण करणा-या फडणवीसांनी जनतेप्रती रामासारखी बांधिलकी आणि नैतिकता दाखवून द्यावी. ते जर सच्चे रामभक्त असतील तर त्यांनी मुख्यमंत्री पदावर लाथ मारून बाजूला व्हावं.
विमान अपघात, विमान आणि हत्या हा प्रकार नवीन नाही. चारशे वर्षापुर्वी विमानाचा आधार घेत 'संत तुकाराम' महाराज यांचाही असाच खून करण्यात आला. संत तुकारामही विमान अस्त्राचे बळी ठरले होते. त्यांचा खून करून ते सदेह वैकुंठाला गेले अशी थाप इथल्या मंबाजी आणि त्यांच्या पिलावळींनी ठोकली होती. भोळ्या-भाबड्या मराठी मनाला भटशाहीने ते पटवून दिलं होतं. त्यासाठी पोथ्या-पुराणात आपल्या कवित्वाची बाळंतपण करत कथा-काव्ये रचली. ती तुकोबारायाच्या नावाने खपवली. आत्ताच्या काळात लोकं शिकलेली नसती किंवा सोळाव्या शतकासारखी भाबडी व धर्मभोळी असती तर कदाचित अजित पवारही सदेह वैकुंठाला गेले अशी थाप इथल्या काही जातीयवादी भामट्यांनी ठोकून दिली असती. आमच्या बहूजन समाजातल्या धर्मभोळ्या बावळ्यांनाही ते पटले असते. वैचारिक अंग गहाण टाकलेल्या या बावळ्यांनी ते प्रवचन-किर्तनातून सांगायलाही सुरूवात केली असती. पण इतकी लबाडी पचणार नाही हे या लोकांच्या लक्षात आले असल्याने किमान अजित पवारांचा अपघात झाला असं तरी सांगितल जातय. अन्यथा हजारो वर्षाचा इतिहास पाहता त्यांनाही सदेह वैकुंठाला धाडलं गेलं असत. संत तुकोबारायांसारखे अजित पवारही विमानास्त्राचे बळी ठरलेत काय ? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रला पडला आहे. या प्रश्नाचे नेमके आणि सत्य उत्तर महाराष्ट्राला मिळायलाच हवे. हा जनतेचा हक्क आणि अधिकार आहे.
दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो. 9561551006
#ajitpawarrohitpawarsupriyasulesanjayrautDevendraphadanvismodi
0 टिप्पण्या