माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी भरतराव मारुती रुपनवर यांची निवड

 माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी भरतराव मारुती रुपनवर यांची निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 13/03/2026 :

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या उपाध्यक्षपदी भरतराव मारुती रुपनवर (रा.कुरबावी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांची निवड करून तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय, शेटे व्यापारी संकुल गांधी चौक,  अकलूज येथे पद नियुक्तीपत्र देऊन नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष भरतराव मारुती रुपनवर यांचा सन्मान करण्यात आला. 

   "तालुका उपाध्यक्षपदी आपली नियुक्ती केलेली आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा! या पदाला साजेशे काम करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण सर्वतोपरी सक्रिय राहुन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी जेणेकरून आपल्या काँग्रेस पक्षाची उज्वल परंपरा कायम राहील" अशी भावना याप्रसंगी तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी व्यक्त केली.

 "तालुक्याच्या उपाध्यक्षपदी आपण माजी नियुक्ती केल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपण माझ्याकडून काम करण्या बाबत  जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यास तडा जाऊ देणार नाही. काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाच्या अधीन राहून आपल्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कार्य करीत राहीन." अशी ग्वाही आपल्या सन्मानाला उत्तर देताना भरतराव रुपनवर यांनी दिली. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले नॅशनल युनियन बॅकवर्ड दिल्ली अर्थात एन यु बी सी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनीही भरतराव रुपनवर यांच्या नियुक्ती बद्दल  शुभेच्छा देत त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या