🟦 सोलापूर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/03/2026 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खा.राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या खासदारांना विरोधकाशी संबंधित कार्यकर्त्याकडून घरात घुसून गोळ्या घालण्याची उघड धमकी देण्यात येणे ही घटना अत्यंत गंभीर आहे. संतापजनक व लोकशाहीविरोधी आहे. सत्ताधाऱ्यांचे मौन हे या धमक्यांना अप्रत्यक्ष समर्थन देणारे असून ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
खा.राहुल गांधी हे संविधान, सत्य व जनतेच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. शेतकरीविरोधी धोरणे,राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशांवर त्यांनी आवाज उठवल्यामुळेच त्यांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून धमकी देणाऱ्यांवर तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा लोकशाही, संविधान व कायद्यावरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल. धमक्या व दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही व जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करत राहिल.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अभ्यासू व निर्भीड प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुणे येथे विरोधकांशी संबंधित गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी केलेला भ्याड हल्ला हा अत्यंत गंभीर, संतापजनक आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात करणारा प्रकार आहे.हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर केलेला नसून, मुक्त विचार, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि संविधानिक मूल्यांवर केलेला थेट प्रहार आहे. वैचारिक विरोधाला वैचारिक उत्तर देता न आल्याने हिंसेचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे हे ज्वलंत उदाहरण असून, अशा प्रवृत्ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत.
लोकशाही व्यवस्थेत हिंसेला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून, त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अशा घटनांना अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष संरक्षण देणाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी.अशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे.
तरी या दोन्ही निवेदनाची दखल घेऊन, योग्य त्या मार्गाने संबंधित यंत्रणांना निर्देश देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.आशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केली.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, तालुका अध्यक्ष भारत जाधव,माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार,रोहित शटगार, सरचिटणीस जहीर मणेर,महंमद शेख,मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन खैरे-पाटील,श्रीशैल रणखांबे,रमेश नामदास, प्रशांत कांबळे, माजी सरपंच महादेव जाधव (गंगेवाडी), मिजाज जहांगीरदार, राजकुमार राठोड, उत्तमकुमार वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या