"जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत..... आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/03/2026 : संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीस, पराभवाची अजिबात भीती वाटत नाही.
सत्य हेच आहे की माणसांना माणसांचीच गरज आहे.
श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते. पण हातातूनं निसटलेली चांगली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून सहजच गुणगुणावे, "तूझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा".
लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक फक्त एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही तुमच्या मध्ये जग पाहतो,
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही. पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. *लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते*
*झुका इतकच की जितक जरुरी आहे. कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो*. जस गरजे पेक्षा जास्त खाल्लेल अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत. आणि यशस्वी होणारे लोकं कारणं सांगत नाहीत.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षणं आहेत.
आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड,
अनोळखी, अनोखी म्हणत असताना,
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे
म्हणजे मैत्री,

0 टिप्पण्या