मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 05/03/2026 :

जीवनात आपण प्रत्येकजण सुखाच्या शोधात असतो. शिक्षण पूर्ण झाले की नोकरी मग बढती, संसार, बंगला, गाडी अन् बरेच काही. हे सर्व मिळवायचे म्हणजे सुख अशी आपली समजूत असते.

हे सर्व मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. यश मिळेल का नाही? ठरवले तसे होईल का! या चिंतेत असतो. रात्रंदिवस डोक्यात हाच विचार भविष्याची चिंता त्यामुळे साहजिकच वर्तमानकाळ सगळा असाच घालवतो.

आपण इतरांशी तुलना करतो. तशी स्वप्ने पाहतो. भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे पण त्यासाठी पूर्ण वर्तमान काळ  हातातून घालवणे कधीच योग्य नाही. चालू क्षण आनंदात घालवणे प्रत्येकाला जमले पाहिजे.

आजचा संकल्प

कोणाची बरोबरी न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घेत भविष्याची पायभरणी करत आनंदाने जगू. आपल्या माणसांना वेळ देऊ व चिंतामुक्त जीवन जगण्याचा अनुभव घेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या