विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 17/03/2026 :

शालेय जीवनात आपले अनेकदा मित्रांच्या बरोबर तुझे-माझे होते. कशावरून पण वाद होतात. मी का गप्प बसू म्हणून आपण पण अरे ला कारे करतो. आपला पण आवाज चढतो अन् विनाकारण वितुष्ट वाढते.

या वयात अशी सवय लागली तर मोठेपणी जरा जड जाते. प्रत्येक वेळेस आवाज चढवून आपण श्रेष्ठ किंवा आपलीच बाजू खरी असे सिद्ध करण्यात काहीच अर्थ नसतो.

मुलांनो, अशा वेळेस कधी कधी शांत रहाणे पण शहाणपणाचे ठरते. बोलून दाखवण्या पेक्षा तुम्ही योग्य वेळी योग्य कृतीतून उत्तर देऊ शकता. आणि तेच जास्त योग्य ठरते. त्यामधून समोरच्या व्यक्तीलापण त्याची चूक लक्षात येते.

वाद वाढवून नाती तोडण्यापेक्षा, आपुलकीने वागून नाती जपा!

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या