इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात?

इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/03/2026 :

Hindi Population Iran: भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का आणि इथे किती हिंदू लोक राहतात ? 

 Hindu Population Iran: 'इराण', इस्त्राइल आणि अमेरिकेत पेटलेल्या युद्धामुळे जगाचं लक्ष मीडिल इस्टकडे लागलं आहे. या भागाची वेगवेगळी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढली आहे. एकीकडे या देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढतोय, तर दुसरीकडे भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, 'इराणमध्येहिंदू' मंदिर आहे का आणि इथे किती 'हिंदू' लोक राहतात? तेच जाणून घेऊयात.

इराणमध्ये किती हिंदू लोक?

इतर आखाती देशांच्या तुलनेत इराणमध्ये हिंदू लोकांची संख्या फार कमी आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमध्ये जवळपास २० हजार ते ४० हजार हिंदू राहतात. हा देशाच्या एकूण ९३ मिलियन लोकसंख्येचा ०.०५ टक्क्यांपेक्षाही कमी भाग आहे. त्याशिवाय भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार जवळपास ९ हजार भारतीत लोक ज्यात विद्यार्थी, व्यापारी आणि मजूर आहेत, ते सध्या इराणमध्ये राहत आहेत. 

इराणमध्ये विष्णू मंदिर 

इराणमधील एक विष्णू मंदिर खूप लोकप्रिय आहे. याला स्थानिक भाषेत इबादतगाह-ए-हिंदू नावाने ओळखलं जातं. याचा अर्थ हिंदूंच्या पूजेचं स्थळ. हे मंदिर १८९२ मध्ये बांधण्यात आलं होतं. हे मंदिर १०० वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. बंदर अब्बासच्या बंदरगाह शहरात व्यापार करण्यासाठी आलेल्या गुजराती लोकांनी बांधलं होतं. या मंदिराची वास्तुकला फार अनोखी आहे. यात भारतीय वास्तुकला आणि इराणी तत्वांचं सुंदर मिश्रण बघायला मिळतं. आज या मंदिरात रोज पूजा होत नाही. याला एक सांस्कृतिक स्थळ आणि संग्रहालयाच्या रूपात संरक्षित केलं गेलं आहे. 

एक आणखी महत्वाचं स्थळ चाबहार या बंदरगाह शहराजवळ आहे. इथेही एक हिंदू मंदिर आहे, ज्याबाबत सांगितलं जातं की, याचं निर्माणही गुजराती व्यापाऱ्यांनी केली होतं. या मंदिरांची स्थापना मुख्यपणे समु्द्र किनारी असलेल्या ठिकाणांवर केली आहे. इथे भारतीय व्यापारी अनेकदा व्यापारासाठी येत होते. हे मंदिर केवळ पूजेसाठीच नाही तर परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी सांस्कृतिक केंद्राच्या रुपातही महत्वाची भूमिका निभावत होते.

अजून कुठे आहेत मंदिरं?

या दोन ऐतिहासिक मंदिरांशिवाय तेहरान, जहेदान आणि इस्फहानसारख्या शहरांमध्येही हिंदूंच्या पूजेसाठी छोटी छोटी मंदिरे असल्याचं समजतं. या स्थळांचा वापर हिंदू लोक वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी धार्मिक रितीरिवाज पार पाडण्यासाठी करत होते.‌ इराणमध्ये हिंदूंची संख्या फार कमी आहे. पण या मंदिरांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठं आहे. जे मंदिरं आज शिल्लक आहेत, ते केवळ धार्मिक स्थळं नाही तर दोन प्राचीन संस्कृतीचा इतिहास आहेत. साभार ऑनलाइन लोकमत.

▪️संकलन : यशवंत वाघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या