आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत इथेनॉल संदर्भात लक्षवेधी

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत इथेनॉल संदर्भात  लक्षवेधी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 15/03/2026 :

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत बोलताना इराणमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम देशातील इंधन दरांवर होत असून सामान्य नागरिकांवर त्याचा मोठा आर्थिक ताण पडत असून आज महाराष्ट्रासह देशातील अनेक साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होत आहे आणि त्याचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर ऑइल कॉर्पोरेशन कंपन्यांनी इथेनॉलचा अधिक प्रमाणात खरेदी करून त्याचा वापर वाढवला, तर पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्याचबरोबर साखर उद्योगालाही मोठा दिलासा मिळेल.तसेच राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे NCDC संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.शंकर सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.या सर्व प्रस्तावांचा सहानुभूतीपूर्वक व तातडीने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी विनंती विधिमंडळात लक्षवेधी दरम्यान केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या