विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/03/2026 :

शाळेत आपण एकमेकांशी भरपूर गप्पा मारतो. शिक्षक शिकवत असले तरी हळू हळू बोलतो. घरी काय झाले त्या गप्पा मारतो, इतर मित्रांविषयी बोलतो. आपला परस्पर संवाद चालू असतो.

संवादातून जवळीकता साधता येते. भावना व्यक्त करता येतात. मात्र हल्ली संवाद कमी कमी होत चालले आहेत. लोक मोबाईल मध्ये जास्त रमतात. घरात सुद्धा जवळ जवळ बसून मोबाइलद्वारे दूरच्या लोकांच्या संपर्कात असतात.

मुलांनो, मोबाईलच्या जास्त आहारी जावू नका. मोठ्या लोकांच्या सर्वच गोष्टींचे अनुकरण करू नका. जवळच्या लोकांशी छान गप्पा मारा, संभाषण कौशल्य वाढवा.

नाती जोडा, जपा व वाढवा. 

भविष्यात जेव्हा माणसांची गरज पडेल तेव्हा मोबाईल उपयोगी पडणार नाही.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या