!! प्रत्येक दिवस तुझाच!!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/03/2026 :
हो आज आठ मार्च जागतिक महिला दिन
सर्वच म्हणणार आज काहीच न तुज विन
वर्षभर मुके-बहिरे असे डोळस अंध-जन
आज मात्र माता-भगिनींचे राखणार मन
पण हा एकच दिवस का तिच्या मानासाठी?
राब-राब राबते जी घर-परिवाराच्यासाठी
आई-बहीण-मावशी-आजी-आत्या बनते
आयुष्यभर फक्त नात्यांचेच ओझे ओढते
ती असते वात घरातल्या जळत्या दिव्याची
गरज भागविते ती कमी-जास्त प्रकाशाची
मुलांना,आजीला,पतीला सुध्दा गरज तिची
आपलं म्हणून कमी तर कामाला हक्काची
ती कुठे कमी नाही तिने सर्वच क्षेत्रे व्यापली
प्रथम स्त्री डॉक्टर, पंतप्रधान, राष्ट्रपती झाली
सैनिक होत अधुनिक झाशीची राणी बनली
सर्वगुण संपन्नतेची उपाधि सुद्धा ती ल्याली
मग सांगा जिच्याशिवाय घरी सर्वच अडते
तिची महती फक्त का आठ मार्चलाच कळते
आयुष्यभर मन मारून जी घरासाठी जगते
सांगा तिच्या मनाला का हौस-मौज नसते?
स्त्री अल्पकाले सखी चिर कालिन असे माता
फिटतील का ऋण बरे हे कोणता जन्म घेता?
वाटते करावे सकलांनीच आत्मचिंतन आता
म्हणावे प्रत्येक दिवस तुझाच असे गं माता
जागतिक महिला दिना निमित्त सर्व माता भगिनिंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
93 26 36 53 96

0 टिप्पण्या