मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/03/2026 :
आपण एकमेकांच्यांमध्ये सतत तुलना करत असतो. कोणी स्वतःला श्रेष्ठ समजतो तर इतरांना कनिष्ठ. दुसऱ्या लोकांच्या चुका काढायच्या, त्यांच्या त्रुटी दाखवायच्या व स्वतःला शहाणे समजायचे अशी सवय असते.
काही लोक मात्र इतरांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतः मधील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्यात व स्वतःला घडवण्यासाठी बुद्धी वापरतात. आपल्यातही काही कमतरता असू शकते हे ते मान्य करतात.
खरे तर आपण किती काळ एकत्र असणार आहोत हे माहित नसते. एकत्र आल्यावर आनंदात हसून-खेळून रहाण्याऐवजी मी मोठा का तू या तुलना कशाला?
आजचा संकल्प
आपल्या सर्वांचा निर्माता एकच आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण समान आहोत ही भावना ठेवून बरोबरीच्या नात्याने वागू व दूजाभाव न करता एकमेकांशी आपुलकीने वागू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या