विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण

 

विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/03/2026 :

विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिगाव व रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, दहिगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  प्रितम महावीर गांधी, गणेश अण्णा लोणकर(अभिनेता, चांडाळ चौकडीच्या करामती),  सुदामराव नेवसे (अभिनेता, चांडाळ चौकडीच्या करामती) यांची विशेष उपस्थिती लाभली.  

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलन झाले. 

कार्यक्रमास सदाशिवनगर चे सरपंच विरकुमार दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर चे उपाध्यक्ष विशाल गांधी, सचिव व विलासचंद्र मेहता आयटीआय दहिगाव चे मार्गदर्शक प्रमोद दोशी, आयटीआय चे चेअरपर्सन  अमित गांधी, अकॅडमीचे चेअरपर्सन  रोनक चंकेश्वरा,  निश्चल व्होरा, शितल गांधी, अभिनंदन गांधी,  अमित गांधी, मांडवे च्या मुख्याध्यापिका सौ. सविता देसाई,उपमुख्याध्यापक पांडुरंग माने, माळशिरसच्या मुख्याध्यापिका सौ. वनिता निंबाळकर, संस्थेचे प्राचार्य  गजेश जगताप तसेच मुख्याध्यापक  सतीश हांगे तसेच सर्व विभागातील शिक्षक, कर्मचारी व पालक वर्ग उपस्थिती होते.    विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा व इतर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रामाणिकपणे परिश्रम करण्याचे मार्गदर्शन केले. इथे शिकलेला विद्यार्थी कधीच वाया जाणार नाही असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  गजेश जगताप व प्रभावी सूत्रसंचालन  हांगे  व  शेंडे  यांनी केले. कार्यक्रमासाठी नाळे, शेंडे  ,सौ रायते , ढेरे , सौ.लाळगे ,सौ.खिलारे  यांनी  परिश्रम घेतले. शेवटी सौ. रायते  यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या