मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 16/03/2026 :

एखादी गोष्ट करताना अवघड वाटली किंवा एखादी अडचण आली तर आपण नाराज होतो. प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून जातो, काय करावे ते सुचत नाही.

अशा वेळेस 'होईल सर्व ठीक, काळजी करू नकोस,' असे जर कोणी आपुलकीने म्हणाले, मानसिक आधार दिला तर किती बरे वाटते. आपल्या बरोबर कोणीतरी आहे ही भावना मनाला भावते.

अडीअडचणीत अडकलेल्या व्यक्तीला इतका मानसिक आधार दिला तरी त्या व्यक्तीला जर बरे वाटणार असेल तर आपण तो मदतीचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

आजचा संकल्प

आपल्या परिचयातील कोणाला काही समस्या असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू व मी आहे तुझ्या सोबत हा आधार देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या