जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी निधी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा... काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

 जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी निधी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा...

 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

वृत्त एकसत्ता न्यूज

सोलापूर दिनांक 30/03/2026 :

सोलापूरच्या  खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजना अंतर्गत विकास कामासाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावातील विकास कामासाठी पत्रव्यवहार केलेले होता. परंतु वर्षभरात मार्च अखेर आला तरी जिल्हा परिषद कडून किंवा शासनाकडून एक रुपयेचा देखील निधी वेगवेगळ्या कामासाठी मिळालेले नाही. याची दखल घेऊन आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीपक जंगम यांची भेट घेऊन खासदार निधी संदर्भात चर्चा केली व निवेदन दिले. यासंदर्भात चौकशी करून दोन दिवसात आपणांस सांगतो असे सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, काँग्रेस पदाधिकारी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा परिषद माजी सभापती अशोकराव देवकते, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण ,बंटी चंदनशिवे, पद्मिनी शेट्टीआर, शिल्पा चांदणे, अँड. महादेव कांबळे, उत्तमकुमार वाघमारे, रोहिणी गायकवाड, शंकर गायकवाड आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी सांगितले की निधी वाटप करताना कुठेतरी दुजाभाव होत असल्याचे या ठिकाणी दिसत असून निधीचा वाटप सर्वांना समान व्हायला पाहिजे जर आठ दिवसांमध्ये निधी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या