विचारधारा



 विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 04/03/2026 :

जीवनात आपण प्रत्येकजण काही कमावतो तसे काही गमावतो सुद्धा. काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गमवाव्या पण लागतात. मात्र काहीवेळा कमवायचे काय होते किंवा काय कमावले हेच समजत नाही.

आपण खूप कष्ट करून, अभ्यास करून जेव्हा यशस्वी होतो तेव्हा यश मिळवले हे महत्वाचे. कष्ट आठवून दुःखी व्हायचे नाही. दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे आले की दुःख विसरले गेले नाही तरी सुख उपभोगायचे.

मुलांनो, अनेकदा काय धरायचे अन् काय सोडायचे तेच आपल्याला समजत नाही. एखाद्यावरील भूतकाळातील राग धरून ठेवतो व वर्तमानकाळातील मैत्रीवर पाणी सोडतो. काही गोष्टी तिथल्या तिथे सोडायला शिका हातातील आनंदाचे क्षण जपा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या