मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/03/2026 :

🚩मराठी नववर्ष - गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आपण गुढी उभारून हा मंगल दिवस साजरा करतो. तोरणे-रांगोळीने घरदार सजवतो.

नवीन वर्षाची सुरुवात व साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्यामुळे पाडवा सण उत्साहात साजरा होतो. घरात देवांचे, गाड्यांचे, सरस्वतीचे पंचांगाचे पूजन केले जाते, नैवेद्याला गोडधोड व जोडीला काहीतरी खरेदी होते. 

या मंगल प्रसंगी आपल्या हिंदू धर्मातील रिती रिवाजाप्रमाणे सणाचे धार्मिक-पौराणिक महत्व समजून घेऊ आणि पुढील पिढीला सांगू. 

आजचा संकल्प

आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची, नीतिमत्तेची, राष्ट्रप्रेमाची, बंधुत्वाची एकात्मतेचे गुढी उभारू व हा सण उत्साहाने साजरा करू.

सौ. स्नेहलता स. जगताप



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या