लवंग जि.प.प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/03/2026 :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महिलादिना निमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर, पाककला स्पर्धा,बालिकांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन अकलूज बीटच्या विस्तार अधिकारी सौ.भक्ती नाचणे यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठी आयोजित पाककृती स्पर्धेचे उद्घाटन सौ.मोहिनी प्रशांत पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र,लवंगच्या वैद्यकीय अधिकारी सौ.मेधा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, लवंग यांचेतर्फे शाळेमध्ये महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले गेले.वैद्यकीय अधिकारी कदम यांनी महिलांनी शरीरातील रक्तवाढीसाठी कोणता आहार घ्यावा याविषयी विशेष मार्गदर्शन केले.छाया हॉस्पिटल व प्रसुतिगृह २५/४ लवंग येथील डॉ गणेश मिटकल यांचेतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले व ॲनिमिया रोगाबद्दल महिलांना सखोल माहिती दिली.मनोरंजनात्मक खेळ व पाककला स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला.सर्व विजेत्या महिलांचा व
बालिकांचा सन्मान सौ.मोहिनी प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. मोहिनी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.शाळेतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.हिरवे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.संगीता भोंग यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अशोक पवार,करीम कोरबू,जावेद मुलाणी, सुरेखा वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या