"सर्जा', 'लखन'ची जोडी ठरली "सहकार महर्षि चषक"ची मानकरी

"सर्जा', 'लखन'ची जोडी ठरली "सहकार महर्षि चषक"ची मानकरी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 15/03/2026 :

श्री विजय गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या बैलगाडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील मनोहर पाटील यांचा 'लखन' व साईनाथ पाटील हिंगोली यांच्या 'सर्जा' ने प्रथम क्रमांक पटकाविला‌. गाडी मालकांना रोख १ लाख ५० हजार व चषक तर बैलांना मानाची झुल, बाशिंग, शेंब्या, तुळशी हार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अकलूज-चाकोरे रोडवर आनंदनगर येथे श्री. विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्यावतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'सहकार महर्षि केसरी बैलगाडा शर्यती'चे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यभरातील ३७२ बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धेचा शुभारंभ माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला १० ओळीत स्पर्धा घेण्यात आल्या,प्रत्येक फेरीत ७ बैलगाडा सोडण्यात येवुन फेरीतील प्रथम क्रमांकाच्या बैलजोडी निवडून उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत ८ बैलगाड्या सोडण्यात आल्या. अंतिम फेरीत लक्ष्मण-सावकार मालक नवनाथ जगदाळे व भारत वळकुंडे वळकुंड(व्दितीय),साई-अर्जुन कार्तिक वावरे माळशिरस व अवतार पवार अंबड जालना(तृतीय)रायफल- सर्जा रणजित निंबाळकर साखरवाडी व आरोही घाडगे शिरसवाडी(चतुर्थ),चिक्या-बकासुर मोहील धुमाळ सुसगाव व अजित जगताप कारुंडे(पाचवा),बुलेट- राजा निखिल कोरडे खडकवासला व योगेश भगत शिरसूफळ(सहावा),छावा-बदाम विक्रम गोरे बागेहल्ली अक्कलकोट व तस्मिय्या सय्यद (सातवा),चिक्या- नाया आशुतोष जाधव कलेढोण व वाशीम एक्स्प्रेस कराड(आठवा)यांना अनुक्रमे १ लाख१० हजार,७१ हजार,६१ हजार,५१ हजार,३१ हजार,२१ हजार,११ हजार व स्मृती चिन्ह देण्यात आले. 

यावेळी नंदिनीदेवी मोहिते पाटील,संयोजक मदनसिंह मोहिते पाटील,आ. रणजितसिंह मोहिते पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील,जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील,विश्वतेजसिंह मोहिते पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील,भाऊसाहेब आंधळकर, सचिव राजेंद्र काकडे, विश्वस्त चंद्रकांत कुंभार,श्रीकांत राऊत,वसुंधरा देवडीकर यांच्यासह प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत विठ्ठल अर्जुन,लखन चव्हाण,लक्ष्मण पवार,गणेश काळे,आप्पा रुपनवर,देवीदास ढोपे,संतोष शिंदे,भैय्या मोरे,बाबुराव शेंडगे, सचिन साळुंखे,मनोज दडस,बाळासाहेब काळे,बाबा बोडरे यांनी पंच म्हणून तर समालोचन,सुनील मोरे केडगाव,प्रताप तात्या झांजुर्णे कोरेगाव विकास जगदाळे झेंडा पंच धनवडे बापू कोरेगाव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या