वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३ बकरी ठार, ४ जखमी, २ बेपत्ता..
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
नागाव दिनांक 15/03/2026 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव येथील राहुल हराळे या मेंढपाळा ची ३ बकरी ठार, ४ गंभीर जखमी,२ बेपत्ता झाली आहेत. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मौजे नागांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील मेंढपाळ राहुल आत्माराम हराळे (बंडा) व सुधाकर सुभाष पुजारी रा. मौजे नागाव ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर , यांच्या सुमारे २५० मेंढरांचा कळप खतासाठी मौजे नागाव येथील शेत मालक अनिल बाबुराव पाटील नागांव (गट नं 140 करलात) यांच्या शेतात गेली आठवड्यापासुन बसायला आहेत.
शनिवार दि. १४/३/२०२६ रोजी ६ ते ७ वा. सुमारास कोल्हा सदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात ३ मेंढरांची कोकरांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी तर २ बेपत्ता आहेत. हल्याची घटना शिवाजी सदाशिव राणगे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या माध्यमातून वनविभाग व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना कळविली. वनरक्षक प्रदिप जोशी यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन घटना स्थळांची पाहणी केली. रविवार १५/३/२०२६ रोजी वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक प्रदिप जोशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. डाॅ. प्रवीण नाईक पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना हेर्ले, यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले.
घटनास्थळी मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, मेंढपाळ सुधाकर सुभाष पुजारी, आत्माराम रंगराव हराळे, शिवाजी राणगे, सुरेश भगवान हराळे, निखिल तात्यासो हराळे इ. मेंढपाळ उपस्थित होते.


0 टिप्पण्या