“पेशव्यांची मदत” घेऊन राज्यसभेत जाणारे जाणते राजे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/03/2026 :
"पेशव्यांची मदत” घेऊन राज्यसभेत जाणारे जाणते राजे — महाराष्ट्राने पाहिला राजकारणातील मोठा विरोधाभास. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा विरोधाभास दिसतात, पण यावेळी जे घडले ते खरोखरच विलक्षण आहे. ज्यांना वर्षानुवर्षे “पेशवे” म्हणून टोमणे मारले, ज्यांच्यावर ब्राह्मणवादी राजकारणाचे आरोप केले, त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने शेवटी शरद पवार यांना राज्यसभेचा मार्ग सापडला — हे महाराष्ट्राने प्रत्यक्ष पाहिले.
राजकारणात विरोधकांवर टीका करणे वेगळे, पण शेवटी त्याच विरोधकांच्या मदतीवर अवलंबून राहणे वेगळे. आज ही परिस्थिती शरद पवारांवर आली आहे.
🔹 “पेशवे” म्हणणाऱ्यांची राजकीय अडचण
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार आणि त्यांच्या राजकीय गोटाने देवेंद्र फडणवीस यांना “पेशवे किंवा पंत " म्हणून टोमणे मारण्याची परंपरा जपली.
राजकारणात जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्नही अनेकदा झाला.
पण शेवटी वास्तव काय झाले?
राज्यसभेवर जाण्यासाठीही त्याच “पेशव्यांची” मदत घ्यावी लागली.
हा केवळ राजकीय योगायोग नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा स्पष्ट पुरावा आहे.
🔹 फडणवीसांची शांत पण प्रभावी रणनीती
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची एक खास शैली आहे.
ते गोंगाट करत नाहीत, मोठमोठे दावे करत नाहीत. पण योग्य वेळी, योग्य चाल खेळतात.
विरोधकांना राजकीय कोंडीत पकडणे
योग्य वेळी योग्य निर्णय घेणे
आणि संपूर्ण राजकीय समीकरण बदलून टाकणे
ही त्यांची शैली आहे.
राज्यसभेच्या या निवडणुकीत ही महाराष्ट्राने तेच पाहिले.
अकेला देवेंद्र क्या कर सकता है| याचे आणखी एक उदाहरण समोर आले.
🔹हा शरद पवारांचा राजकीय पराभव?
याबाबत मतभेद असू शकतात.
काही जण म्हणतील की हे केवळ राजकीय व्यवहार आहे.
तर काही जण म्हणतील की हा शरद पवारांच्या राजकीय प्रभावाच्या घटण्याचा संकेत आहे.
कारण महाराष्ट्रात कधीकाळी अशी परिस्थिती होती की पवारांच्या एका शब्दावर समीकरणे बदलायची.
आज मात्र राज्यसभेसारख्या प्रतिष्ठेच्या पदासाठीही दुसऱ्यांच्या मदतीची गरज भासते.
🔹 महाराष्ट्राच्या राजकारणातील बदललेले वास्तव
एक काळ असा होता की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे “किंगमेकर” मानले जात.
पण आज परिस्थिती उलटी होताना दिसते.
आज महाराष्ट्रात राजकीय पटावर प्रभावी चाल कोण खेळतो?
सर्वांच्या मते त्याचे उत्तर एकच आहे — देवेंद्र फडणवीस.
🔹 शेवटचा विरोधाभास
या घटनेने एक मोठे सत्य महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.
ज्यांना “पेशवे” म्हणत राजकीय टीका केली,
त्याच “पेशव्यांच्या” मदतीशिवाय राज्यसभेत जाता येत नाही —
याला राजकीय देवाण घेवाण म्हणायचे,
की बदलत्या काळाचे संकेत?
याचे उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायचे आहे.
पण एक गोष्ट मात्र निश्चित —
महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले की
अकेला देवेंद्र क्या कर सकता है।|
--- दयानंद नेने

0 टिप्पण्या