महिला दिनानिमित्त अकलूज पोलीस ठाणे च्या वतीने महिलांचा सन्मान

महिला दिनानिमित्त अकलूज पोलीस ठाणे च्या वतीने महिलांचा सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 11/03/2026 : महिला दिनानिमित्त International Women's Day अकलूज पोलीस ठाण्या च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असणाऱ्या महिलांचा सन्मान पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे यांच्या हस्ते करण्यात आला.

 अकलूज पोलीस ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ रेश्मा आडगळे,महिला नगरसेवक, अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत महिला पोलीस पाटील, महिला होमगार्ड, महिला दक्षता समितीतील डॉक्टर,वकील, शिक्षक समाजसेविका असे सर्व सदस्य तसेच पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ तसेच फुलांचे झाड देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या अनुभवांबरोबरच महिलांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी, समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले. तसेच महिला सुरक्षेबाबत आणि सक्षमीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या